पवना धरणातून 4785 क्यूसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा...

(सह्याद्री बुलेटिन ) पिंपरी-चिंचवडकरांसह मावळवासियांची तहान भागविण्यारे पवना धरण ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 100 टक्के भरले आहे. त्यामुळे शहरवासीयांसह मावळ परिसरातील नागरिकांचा वर्षभराचा पाण्याचा प्रश्न संपला आहे. एक जूनपासून 2774 मिमी पाऊस धरण परिसरात झाला आहे. गतवर्षी आजच्या तारखेला 2582 मिमी पाऊस झाला होता.
मंगळवारी सकाळी साडेआठ वाजल्यापासून 4785 क्यूसेक या वेगाने नदीत पाणी सोडण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.‘पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. यामुळे येडसे-शिवली रस्ता पाण्याखाली जाईल. तसेच संबंधित यंत्रणांना आपल्या कार्यक्षेत्रातील नदी काठच्या गावांना सावधनतेचा इशारा देण्याच्या सूचना केल्या आहेत. पावसाची परिस्थती पाहून पाणी कमी-जास्त केले जाणार आहे’, अशी माहिती शाखा अभियंता ए.एम.गदवाल यांनी दिली.

 

Review