काँग्रेस पक्षाचे कोषाध्यक्ष म्हणून अहमद पटेल यांची नियुक्ती...
सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांच्याकडे कोषाध्यक्षपद सोपवले आहे.काँग्रेसचे सरचिटणीस अशोक गहलोत यांनी या नव्या नियुक्त्यांबाबत परिपत्रक काढले आहे. तसेच, या नव्या नियुक्त्यांची अंमलबजावणी तातडीने करण्याचे आदेश दिले आहेत.