आशियाई स्पर्धांमध्ये दुमदुमली मराठमोळी नौबत राही सरनोबतला सुवर्ण पदक...
( सह्याद्री बुलेटिन ) नेमबाज राही सरनोबत हिने 18व्या आशियाई स्पर्धांमध्ये भारताला चौथ्या सुवर्ण पदकाची केली आहे. राहीने बुधवारी झालेल्या महिलांच्या 25 मीटर पिस्तुल प्रकारात 34 अंकांसह सुवर्ण पदकाची कमाई केली. आशियाई स्पर्धांमधील राहीचे हे दुसरे पदक आहे. राहीने 2014 इंचियोन एशियाडमध्येही याच प्रकारात कांस्य पदकाची कमाई केली होती. राहीने या पदकांची कमाई करत आशियाई स्पर्धेतील विक्रमही रचला आहे.या एशियाड स्पर्धेत 25 मीटर पिस्तुल प्रकारात रौप्य पदताची मानकरी ठरली. थायलंडची नपास्वान यांगपेबून. यांगपेबून हिनेही 34 अंक मिळवले. पण शूटआऊटमध्ये ती 5 पैकी फक्त 2 टारगेट वर निशाणा लावू शकली. 29 अंकांच्या स्कोरसह कोरियाच्या किम मिनजुंगने कांस्य पदक मिळवले.
