'हम तो चँद्र गुप्त बनाने निकले थे, हमे क्या पता था चँदा गुप्ता बन जाएगा'
आशुतोष यांच्या राजीनाम्यानंतर आपचे माजी नेते आणि कवी कुमार विश्वास यांनी केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला होताच पण आता खेतान यांच्या राजीनाम्यानंतरही विश्वास यांनी केजरीवालांना लक्ष्य केले आहे.
'हम तो चँद्र गुप्त बनाने निकले थे, हमे क्या पता था चँदा गुप्ता बन जाएगा' असे ट्विट कुमार विश्वास यांनी केले आहे.
आप पक्षाला मिळणाऱ्या गुप्त (निधी) वरुन विश्वास यांनी केजरीवालांना टार्गेट केले आहे. तर प्रसिद्ध वकिल आणि आपचे जुने सहकारी प्रशांत भूषण यांनीही केजरीवालांवर निशाणा साधला आहे. काही लोकांनी महान आदर्शांचा उद्देश ठेवून आम आदमी पक्षाची स्थापना केली, पण, कडवटपणामुळे त्यांच्या सूचनांना दुर्लक्ष केलं जात आहे. आपची स्थापना म्हणजे एक मोठा आशावाद होता. मात्र, एका व्यक्तीच्या बेईमान महत्वकांक्षा आणि दूरदृष्टीच्या कमतरतेमुळे सर्वकाही नष्ट झाले आहे. एखाद्या संस्थेला कशाप्रकारे नेस्तनाबूत करावे, याचे उदाहरण (केस स्टडी) म्हणजे आप असल्याचे भूषण यांनी ट्विट केले आहे.