आण्णा आंदोलनाचे समर्थक आणि जेष्ठ पत्रकार कुलदीप नैयर यांचे निधन
(सह्याद्री बुलेटीन ) भारतीय इतिहासाचे सत्तर वर्षापासून साक्षीदार राहिलेले जेष्ठ पत्रकार कुलदीप नैयर यांचे आज (गुरूवार) निधन झाले आहे ते ९५ वर्षाचे होते. लोधीघाट येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येतील.
कुलदीप नैय्यर यांचा जन्म पाकिस्तान च्या सियालकोट मधे १४ आँगस्ट १९२४ ला झाला होता. ते भारतातील प्रसिध्द पत्रकार आणि लेखक होते. त्यांनी युएनआई, पीआईबी, द स्टेट्समैन, इंडियन एक्सप्रेस च्या बरोबर काम केले.
२५ वर्ष ते द टाइम्स लंदन मधे पत्रकार होते.
२०११ च्या आण्णांच्या आंदोलनाचेही ते समर्थक होते.
त्यांचे शिक्षण सियालकोट येथे झाले तर लाहोर ला त्यांनी कायद्याचे शिक्षण पुर्ण केले. पत्रकारितेची पदवी अमेरिकेत घेतली होती. आणि आपल्या कार्याची परिपुर्णता भारतात केली.