जात प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या 20 नगरसेवकांचे पद रद्द...
मुदतीत जात प्रमाणपत्र सादर न केल्याने कोल्हापूर महापालिकेच्या 20 नगरसेवकांना सुप्रीम कोर्टाने दणका दिला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 20 नगरसेवकांचे पद रद्द करण्यात आले आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे या प्रभागात फेरनिवडणूक होणार आहे.आरक्षित जागेवर निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींना निवडणुकीनंतर सहा महिन्यात जात प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक असतं. मात्र या नगरसेवकांनी निर्धारित वेळेत जातपडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांचं पद रद्द करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे या प्रभागात फेरनिवडणूक होणार आहे.