मराठी विनोद सम्राट विजय चव्हाण रुग्णालयात दाखल...

मराठी चित्रपट सृष्टीतील विनोद सम्राट आणि जेष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.ते गेल्या कित्येक दिवसांपासून आजारी आहेत. दरम्यानच्या काळात त्यांची तब्येत चांगलीच सुधारली होती. पण आता पुन्हा एकदा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुलुंडमधील फोर्टिस रुग्णालयात विजय चव्हाण यांना कालपासून दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वृत्त आहे. विजय चव्हाण यांनी आतापर्यंत 350-400 चित्रपटांमध्ये काम केले आहे. मोरूची मावशी, श्रीमंत दामोदर पंत ही त्यांची नाटकं प्रचंड गाजली आहेत. त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 1985 साली प्रदर्शित झालेल्या वहिनीची माया या चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.

Review