गावाकडची रणधुमाळी, १,११० ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक जाहीर...
महाराष्ट्रातील २६ जिल्ह्यामधील १०४१ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक आणि ६९ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या रिक्त पदांसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केली आहे यासाठी २६ सप्टेंबर रोजी मतदान होऊन २७ सप्टेंबरला मतमोजणी होईल याची आजपासूनच आचारसंहिता लागू करण्यात आली आहे अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त जे एस सहारिया यांनी दिली आहे.
राज्य निवडणूक आयोगानुसार या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र ५ ते ११ सप्टेंबर दरम्यान भरण्यात येतील, याची छाननी १२ सप्टेंबरला होईल,१५ सप्टेंबर पर्यंत नामनिर्देशन पत्र पाठीमागे घेता येईल आणि त्याच दिवशी वाटपही करण्यात येईल, मतदान २६ सप्टेंबर रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेमध्ये करण्यात येईल. गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामपंचायतीसाठीची वेळ सकाळी साडे सात वाजल्यापासून ते ३ वाजेपर्यंत निर्धारीत करण्यात आलेली आहेत. मतमोजणी २७ सप्टेंबरला होईल,
महाराष्ट्रातील एकूण १०४१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका आणि ६९ ग्रामपंचायतीच्या पोट निवडणुकांचा यामध्ये समावेश आहे