जगातील सर्वात महत्वाची बातमी, आदित्य ठाकरे यांच्या गाडीचा टायर फुटला ?

(सह्याद्री बुलेटिन) - युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे नाशिकला दोन दिवसांच्या दौऱ्यावर जात असताना घोटीजवळ मोठ्या खड्ड्यांमुळे ठाकरेंच्या आलिशान रेंजरोव्हर गाडीचा टायर फुटला. आदित्य ठाकरे सुखरुप असून टायर फुटल्याने त्यांना दुसऱ्या गाडीने हॉटेलला पोहचावे लागले.

मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर घोटीजवळ पाडळी गावात ही घटना घडली. आदित्य ठाकरे यांच्या गाडीचा टायर फुटल्याने त्यांच्यासोबत असलेल्या इतर मंडळींची धावपळ झाली. या घटनेनंतर आदित्य ठाकरे दुसऱ्या गाडीने गेले. तसेच त्यांची टायर फुटलेली गाडी टायर बदलण्यासाठी नाशिकला आणली गेली.

(या देशात स्वतःच्या न्याय हक्कासाठी लढावे लागते, अत्याचार,बलात्कार,खून,हल्ले,आत्महत्या,या विषयांना एवढे फुटेज मिळत नाही पण या बातमीला मात्र राष्ट्रीय समस्या असल्याप्रमाणे मांडले गेले, कोणत्या समस्या मांडाव्यात आणि कोणत्या नाही याचे भानही यांना उरले नाही. लोकशाहीचा हा चौथा स्तंभ असा बेगडी पायावर उभा असेल तर अजूनही लोकशाही अपंग आहे असे म्हणावे लागेल.)

Review