गणेशोत्सवात धिंगाणा संस्कृती नको - गिरीश बापट
पिंपरी (सह्याद्री बुलेटीन) - गणरायाच्या आगमन आणि विसर्जनाच्या वेळी उत्साही कार्यकर्त्यांचा मद्यपान करुन धिंगाणा सुरु असतो. त्यामुळे उत्सवाला गालबोट लागते. त्याचे भान ठेवून गणेशोत्सवात धिंगाणा संस्कृती टाळावी आणि डॉल्बीमुक्त व दारुमुक्त गणेशोत्सव साजरा करावा, असा सल्ला जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना दिला. तर, उत्साहात दारु पिणा-या कार्यकर्त्यांना पोलिस कोठडीची हवा दिली जाईल, असा दमही त्यांनी भरला.
पिंपळे गुरव येथील निळु फुले नाट्यगृहात श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने पिंपरी-चिंचवड राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभ गुरुवारी (दि.२३) पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, महापौर राहुल जाधव, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, नगरसेविका शारदा सोनवणे, भाजपचे प्रवक्ते अमोल थोरात आदी उपस्थित होते.
पालकमंत्री बापट म्हणाले, लोकमान्य टिळकांनी विशिष्ट हेतुने गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. पण, या उत्सवाचा खरा हेतु साध्य होताना दिसत नाही. अनेक मंडळे जनजागृतीपर संदेश, गरजूंना मदत, आरोग्य, स्वच्छता, वृक्षारोपण अशा उपक्रमांतून सामाजिक सलोखा जोपसतात. धार्मिक सण साजरे करताना प्रत्येकाने अन्य धर्माचा अनादर होणार नाही. याची काळजी घेणे गरजेचे आहे. उत्सवांमध्ये सुरक्षितता महत्त्वाची आहे. सध्या समाजकंटक धार्मिक तेढ निर्माण करून