तडीपार केलेल्या इसमास चिंचवड पोलिसांनी हत्यारासह केले गजाआड- येरवडा कारागृहात रवानगी.

सह्याद्री बुलेटिन )दि २३/०८/२०१८ रोजी बिजलीनगर येथे रात्री ०९/३० वा. गुरूद्वाराकडे जाणा-या रोडवर चिंचवड पोलिस स्टेशनने तडीपार केलेला इसम गुरूद्वारा रोडवर उभा असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती पोशि १०४४१ माने यांना मिळताच तपास पथकाचे सपोनि अभिजीत जाधव ,पो हवा जगताप,पोना शेलार,पोशि माने असे तात्काळ सदर ठिकाणी गेले असता चिंचवड पोस्टेने दोन वर्षासाठी तडीपार केलेला इसम नामे उचप्पा लिंगाप्पा मंगळूर वय २५ रा बिजलीनगर चिंचवड,पुणे हा नागसेन नगर, बिजलीनगर, गुरूद्वारा रोडकडेने संशयीत रित्या फिरताना मिळून येताच त्यास तपास पथकाच्या टीमने ताब्यात घेतले व त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे शर्टपॅन्टच्या आतून लपविलेला लोखंडी कोयता मिळाला.
सदरच्या तडीपार इसमाविरूध्द गुन्हा दाखल केला असून न्यायालयाने त्याची १४ दिवस येरवडा कारागृहात रवानगी केली आहे.

सदरची कारवाई ही मा.पोलीस उपायुक्त परि-१ स्मार्तना पाटील मॅडम, मा.सहा पोलीस आयुक्त,पिंपरी विभाग सतिश पाटील साे, मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर शिंदे सो मा.पोनि(गुन्हे) विश्वजीत खुळे सो यांच्या मार्गदर्शनाखाली तपासपथकाचे सहा पोलीस निरीक्षक अभिजीत जाधव,पो हवा जगताप,स्वप्निल शेलार,अमेाल माने,पोशि गोविंद डोके, पंकज भदाने,मपोना वंदना गायकवाड यांनी कामगिरी केली आहे

Review