द्रमुक अध्यक्षपदी एम. के. स्टालिन यांची निवड

तामिळनाडूतील द्रविड मुन्नेत्र कळघमच्या (द्रमुक) अध्यक्षपदी त्यांचे पुत्र एम के स्टालिन यांची निवड करण्यात आली आहे.करुणानिधी यांच्या निधनानंतर पक्षाची धूरा त्यांचे पूत्र स्टालिन यांच्याकडे सोपवली जाईल, हे स्पष्ट होते. मंगळवारी पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली. अपेक्षेनुसार या बैठकीत स्टालिन यांची पक्षाध्यक्षपदावर निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर दुरई मुरुगन यांची पक्षाच्या खजिनदारपदी निवड करण्यात आली.पक्षाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर स्टालिन यांनी करुणानिधी आणि अण्णादुराई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. या बैठकीत करुणानिधी यांना भारतरत्न पुरस्कार देण्याचा ठरावही मंजूर करण्यात आला.

Review