समाजवादी सेक्युलर मोर्चा नावाने नवीन पक्ष स्थापन... समाजवादी पार्टीला ग्रहण...

समाजवादी पक्षाचे उत्तर प्रदेशातील माजी प्रदेशाध्यक्ष आणि मुलायम सिंह यांचे भाऊ शिवपाल यादव यांनी नव्या पक्षाची घोषणा केली आहे. शिवपाल यादव यांनी समाजवादी सेक्युलर मोर्चा नावाने पक्ष स्थापन केला आहे. समाजवादी पक्षातील उपेक्षित लोकांना या पक्षाशी जोडण्याचे काम करणार असल्याचे शिवपाल यादव यांनी सांगितले आहे. तसेच समाजवादी पक्षाचे माजी अध्यक्ष मुलायम सिंह यादव हे सुद्धा या पक्षात दाखल होतील, दावा शिवपाल यादव यांनी केला आहे.
वाट पाहता पाहता दीड वर्ष उलटून गेले आहे. शेवटी उपेक्षा तरी किती सहन करायची? सहनशक्तीलाही काही मर्यादा असतात, असे शिवपाल यादव यांनी रक्षाबंधना दिवशी बहिणीकडून राखी बांधून घेतल्यानंतर म्हटले होते.

Review