१ सप्टेंबरला कोल्हार येथे भव्य शेतकरी सत्संग मेळावा...

कोल्हार,(सह्याद्री बुलेटीन) - अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठचे शिल्पकार आणि दिंडोरी प्रणित सेवा मार्गाचे प्रमुख प. पु. गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या उपस्थितीत कोल्हार (ता राहाता ) येथील श्रीक्षेत्र श्री भगवती माता मंदिर प्रांगणात, शनिवार दिनांक 1 सप्टेंबर रोजी भव्य शेतकरी सत्संग मेळावा होणार असल्याचे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचे सेवेकरी, गावकरी व भाविक मंडळ यांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

याप्रसंगी चंगळवाद, निव्वळ मनोरंजन, अतिताण याच्या प्रभावाखाली असलेल्या सध्याच्या पिढीचा मार्गदर्शन करण्यासाठी आणि भविष्यातील प्रगत भारताच्या सु निर्माणासाठी गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांचे धर्म, देश, प्रांत, सीमा यांच्या भेदाच्या पलीकडे उद्बोधन करणारे, मानवी जीवनाचा सर्वांगीण, परिपुर्ण विकास करण्याची सेवा सांगणारे विचार यावेळी मांडले जातील.
१ सप्टेंबरला कोल्हार येथे भव्य शेतकरी सत्संग मेळावा...
कृषिशास्त्र, आयुर्वेद शास्त्र, योग वेद विज्ञान, संशोधन, कायदा जागरूकता, वास्तुशास्त्र, मानवाच्या विविध समस्या, गुरु प्रणाली अंतर्गत ग्राम अभियान, स्वयंरोजगार शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान, शेतीचे वास्तुशास्त्र, पर्जन्य देवतेची उपासना या सर्व मानवी जीवनाला परिपूर्ण करणाऱ्या बाबींवरती गुरुमाऊली प्रबोधनात्मक हितगुज करणार आहेत.
 या मेळाव्यासाठी हजारोंच्या संख्येने दिंडोरी प्रणित सेवा केंद्रातून सेवेकरी केंद्र प्रतिनिधी व राज्यातून असंख्य भाविक भक्तगण सेवेकरी उपस्थित राहणार आहेत. गुरुमाऊलींच्या विचारांचे सिंचन आपण आत्मसात करून भाविकांनी आपले जीवन उन्नत करून घ्यावे.असे आवाहन राहता तालुक्यातील सर्व सेवेकर्‍यांनी केले आहे.

Review