संशयित नक्षलींचा जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावाद्यांशी संबंध ? देशात ‘सशस्त्र क्रांती’ घडवणे, पंतप्रधान नरेंद माेदींना लक्ष्य करण्याच्या कट...

पाेलिसांनी मंगळवारी अटक केलेल्या संशयित नक्षलींचा जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावाद्यांशी संबंध असल्याचे पुरावे मिळाल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपअायुक्त शिरीष सरदेशपांडे यांनी दिली अाहे. प्रक्षाेभक भाषणे करून देशभरातील युवकांना सरकारविराेधात भडकवणे, शस्त्रास्त्रे जमा करणे, देशातील प्रमुख व्यक्तींच्या हत्येचा कट रचणे, दंगली घडवणे, अशा प्रकारे विविध कारवायांच्या माध्यमातून जम्मू-काश्मीरसारखी परिस्थिती निर्माण करून देशाची शांतता, सुव्यवस्था धाेक्यात अाणून सरकारविराेधात लढाई करण्याचे षड््यंत्र रचण्यात अाले हाेते, असे सरदेशपांडे म्हणाले.
वारवरा राव, सुधा भारद्वाज, गाैतम नवलाखा, अरुण परेरा, व्हेरनॉन गोन्साल्विस या पाच जणांना मंगळवारी पुणे पाेलिसांनी अटक केली. सर्वाेच्च न्यायालयाने या सर्वांना नजरकैदेत ठेवण्याचे अादेश दिल्यामुळे पाेलिसांनी त्याप्रमाणे पुढील कारवाई करावी, असे अादेश पुण्यातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. डी. वढणे यांनी बुधवारी दिले. तत्पूर्वी सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी न्यायालयासमाेर या संशयितांच्या अनेक कारवायांचा पाढाच वाचला.
नेपाळमधून माेठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा मिळवून देशात ‘सशस्त्र क्रांती’ घडवणे, पंतप्रधान नरेंद माेदींना लक्ष्य करण्याच्या कटात या लाेकांचा सहभाग असल्याचा अाराेपही त्यांनी केला. दरम्यान, तब्बल अाठ काेटी रुपयांची ही शस्त्र खरेदी असल्याचा दावा यापूर्वी पाेलिसांनी केलेला अाहे.
हे पाचही जण सरकारने बंदी घातलेल्या ‘सीपीअाय’ (एम) संघटनेच्या केंद्रीय समितीचे सदस्य असल्याचे पाेलिसांचे म्हणणे अाहे. नेपाळमध्ये शस्त्रे खरेदी करून पंतप्रधान माेदींच्या रॅलीत घातपात घडवण्याचा या संशयितांचा डाव हाेता. या शस्त्रांचा कॅटलाॅगही संशयितांना पाठवण्यात अाल्याचा एका पत्रात उल्लेख अाहे. काेरेगाव भीमा येथील दंगल शांत न करता ती वाढवत न्यावयाची अाहे अाणि त्यासाठी काय करावयाचे अाहे याबाबत दाेन गाेपनीय पत्रे सरकारी वकिलांनी पुण्याच्या सत्र न्यायालयात सादर केली.
‘सीपीअाय’च्या (एम) नेतृत्वात देशात अँटी फॅसिस्ट फ्रंट उभारण्याची संशयितांची याेजना हाेती. त्यासाठी ‘अाॅल इंडिया युनायटेड फ्रंट’मध्ये तरुणांची, विद्यार्थ्यांची भरती करण्याची जबाबदारी ठाण्यातून पकडलेेले अरुण परेरा अाणि मुंबईतील व्हेरनॉन गोन्साल्विस यांच्याकडे हाेती. या तरुणांना जंगलात प्रशिक्षण देऊन पुन्हा शहरात अाणायचे व सरकारविराेधात त्यांना वापरायचे, असे षड््यंत्र हाेते. समाजात विद्राेही विचारांचा प्रसार करणे अाणि सरकारविराेधात जनमत तयार करण्याची या दाेघांची जबाबदारी हाेती.

 

Review