नवनगर प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी सदाशिव खाडे यांची नियुक्ती...
पिंपरी (सह्याद्री बुलेटीन) - भाजपचे माजी शहराध्यक्ष आणि दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे निकटवर्तीय सदाशिव खाडे यांची अखेर पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकारणाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे.
राज्य शासनाने राज्यातील विविध महामंडळे व प्राधिकरणाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकारणाचे अध्यक्षपद देखील गेल्या अनेक वर्षांपासून हे पद रिक्त होते. राष्ट्रवादी काँग्रेसने या पदावर कोणाची वर्णी केली नाही. मात्र, भाजपने प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी जुन्या निष्ठावंतापैकी असलेल्या सदाशिव खाडे यांची नियुक्ती केली आहे. महापालिकेतील भाजपच्या सत्ता स्थापनेपासून त्यांच्या प्राधिकरण अध्यक्षपदाबाबत चर्चा होती. मात्र, त्यावर अखेर शुक्रवाी शिक्कामोर्तब झाले आहे.