महाराष्ट्र राज्य किमान वेतन सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. रघुनाथ कुचिक
पुणे (सह्याद्री बुलेटिन ) - राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य किमान वेतन सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे उपनेते डॉ. रघुनाथ कुचिक यांची शुक्रवारी ही नियुक्ती केली आहे.
डॉ. रघुनाथ कुचिक हे भारतीय कामगार सेनेचे विद्यमान सरचिटणीस आहेत. कामगार क्षेत्रात त्यांचे मोठे कार्य आहे. त्यांनी शिवसेनेचे पुण्याचे उपशहरप्रमुख पद देखील सांभाळले आहे. त्यांची नुकतीच शिवसेनेच्या उपनेतेपदी वर्णी लागली आहे.राज्य सरकारने विविध विकास महामंडळे, मंडळे व प्राधिकरणाच्या रिक्त असलेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती पदांवरच्या एकूण 21 नियुक्त्या शुक्रवारी (दि.31) जाहीर केल्या आहेत. त्यामध्ये डॉ. रघुनाथ कुचिक यांची महाराष्ट्र राज्य किमान वेतन सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.