दहीहंडी उत्सव शांततेत पार पाडण्याचे पोलिसांचे आवाहन...

पिंपरी (सह्याद्री बुलेटीन) सोमवारी साजरा होणारा दहीहंडी उत्सव सर्व मंडळांनी शांततेत साजरा करावा, असे आवाहन अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी केले. 
 
ऑटो क्लस्टर येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांच्या अध्यक्ष व पदाधिकारी यांची बैठक शनिवारी घेण्यात आली यावेळी शहरातील 51 मंडळांचे अध्यक्ष, पिंपरी, चिंचवड, निगडी,भोसरी, भोसरी एमआयडीसी,दिघी, वाकड, चाकण, देहूरोड, तळेगाव, तळेगाव एमआयडीसी, हिंजेवडी, सांगवी, आळंदी पोलीस ठाण्याचे अधिकारी उपस्थित होते.
रानडे यांनी सांगितले की, मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे सर्वांनी काटेकोरपणे
पालन करावे जनतेला नाहक त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी, तसेच दहीहंडी उत्सवात वेळेचे बंधन, डी जे चा वापर न्यायालयाच्या आदेशानुसारच करावा.

Review