श्रीमंतांचा खेळ होतो, तरुणांचा जीव जातो,... नव्हे गेला. शेकडो जखमी...एकाचा मृत्यू...

मुंबई (सह्याद्री बुलेटिन ) - न्यायालयाचे आदेश डावलून सुरक्षा नियमांना हरताळ फासल्याने अनेक ठिकाणी उत्साहाला गालबोट लागून शेकडो गोविंदा जखमी झाले; तर धारावी येथे कुश खंदारे (वय 20) या गोविंदाचा आकडी येऊन थरावरून पडल्याने मृत्यू झाला. 37 जखमींवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.
दहीहंडीच्या उंचीवर मर्यादा नसली, तरी 14 वर्षांखालील मुलांना मनाई करण्यात आली होती; तसेच शेवटच्या थरावरील गोविंदाला सुरक्षा दोर लावणे बंधनकारक होते. या नियमांची हंडी आयोजकांनी फोडली आहे. अनेक गोविंदा पथकांनी 14 वर्षांखालील लहान मुलांना वरच्या थरावर चढवले होते. कुलाबा येथे हंडी फोडताना एक नऊ वर्षांचा मुलगा जखमी झाला. महाराष्ट्रात हजारो दहीहंड्या आहेत, या बहुतेक सर्वच राजकीय नेत्यांच्या आणि श्रीमंतांच्या आहेत, पण यात भाग घेणारे गोविंदा मात्र सर्बसामान्य घरातून आलेले आहेत, याना न्यायालयाने सांगितले, सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवला पण कानाडोळा करण्यात आला. यामुळे राजकीय स्वार्थ तर साधला जातोय पण तरुणांच्या जीवाला मात्र धोका पोहोचतो.

Review