व्यवसायाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या रांका परिवारावर स्वामी समर्थांचा आशीर्वाद - अण्णासाहेब मोरे

कोल्हार (सह्याद्री बुलेटीन ) - व्यवसायाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या रांका परिवारावर स्वामी समर्थांचा आशीर्वाद असल्याचे प्रतिपादन परमपूज्य गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांनी केले. कोल्हार येथील राजुरी रोडवर नव्याने सुरू करण्यात आलेल्या एस. एस. आर. मार्केटचे उद्घाटन प. पू. अण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी जि. प. अध्यक्षा शालिनीताई विखे-पाटील अँड. सुरेंद्र खर्डे, उद्योजक राजेंद्र कुमार कुंकुलोळ, डॉक्टर भास्करराव खर्डे, सरपंच रिनाताई खर्डे, भगवतीपुरचे सरपंच रावसाहेब खर्डे, एस. एस. आर. मार्केटचे संचालक संतोष सुखलाल रांका, संजय सुखलाल रांका, सौ. सुवर्णा रांका, रेखा रांका, प्रतीक्षा रांका, भाग्यश्री रांका, अमर संतोष रांका, सौरभ संतोष रांका, मोहन शेठ लोढा, विशाल कांकरिया, सुरेश रांका, भिकचंद रांका, संदीप रांका यांच्यासह परिवारातील सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी अध्यक्ष शालिनीताई विखे पा., सुरेश खर्डे, उद्योजक राजेंद्र कुंकुलोळ, डाँ.भास्करराव खर्डे, आदींनी आपले मनोगत व्यक्त करून रांका परिवारास शुभेच्छा दिल्या.
यावेळी गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांचा सत्कार रांका परिवाराच्यावतीने संतोष रांका यांनी केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सौ कल्पना धाडीवाल यांनी केले, तर आभार प्रदर्शन अमर रांका यांनी केले.

Review