कुछ मिठा हो जाए,,, पाच रुपयांचे चॉकलेट घ्या आणि १ जी बी डेटा मिळावा मोफत,,,
मुंबई (सहयाद्री बुलेटिन ) - जिओ ने कुछ मिठा हो जाए, म्हणत ग्राहकांशी गोड नाते जपण्यासाठी पुढाकार घेतला आहे. कंपनीकडून आपल्या द्वितीय वर्षपूर्तीनिमित्त डेअरी मिल्क चॉकटेलसोबत 1 जीबी डेटा मोफत देण्यात येणार आहे. रिलायन्स जिओने टेलिकम्युनिकेशन क्षेत्रात क्रांती घडवून आणली आहे. जिओच्या एंट्रीनंतर इंटरनेट आणि कॉलिंग पॅकेजसाठी सर्वच कंपन्यांमध्ये तुफान स्पर्धा सुरु झाल्याचे आपण पाहात आहोत. मात्र, रिलायन्स जिओने सर्वांपुढे आघाडी घेत आपले स्थान अबाधित आणि कायम ठेवले आहे. रिलायन्स जिओच्या एंट्रीला आता दोन वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त कंपनीने ग्राहकांचे तोंड गोड करण्याचे ठरवले आहे. त्यामुळेच, डेअरी मिल्क कॅडबरीच्या खरेदीवर चक्क 1 जीबी डेटा मोफत देऊन ग्राहकांशी गोडवा जपण्याचं काम जिओने केलं आहे.
डेअरी मिल्कच्या 5 रुपयांपासून सुरू होणाऱ्या सर्वच चॉकलेटवर ही ऑफर मिळणार आहे.