दिल्लीत दोन दहशतवाद्यांना दोन पिस्तुल, 10 काडतुसे आणि 4 मोबाईलसह अटक...

दिल्ली (सह्याद्री बुलेटिन) - लाल किल्ला परिसरात,जमा मशीदीजवळच्या बस थांब्यावर, दिल्ली पोलिसांनी आयएसआयएसच्या दोन दहशतवाद्यांना अटक केली.
परवेज आणि जमशेद अशी त्यांची नावे असून ते इस्लामिक स्टेट इन जम्मू कश्मीर या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहेत. या दोघांकडे दोन पिस्तुल, 10 काडतुसे आणि 4 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. ही शस्त्रे त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये खरेदी केली होती. तसेच दोघेही दिल्लीहून काश्मिरला जाणार होते.
हे दोघेही काश्मीरचे रहिवासी आहेत. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास यंत्रणा चौकशी करत आहेत.

Review