एका चुकीवरून लक्ष वळवण्यासाठी राम कदमांची दुसरी चूक, जिवन्त सोनाली बेंद्रेला श्रद्धांजली,

मुंबई (सह्याद्री बुलेटिन) - दहीहंडी उत्सवाच्या वादगस्त विधानावरुन लक्ष वाळविण्यासाठी भाजपचे आमदार राम कदम आपल्या चुकीच्या ट्विटमुळे संकटात सापडले आहे. कदम यांनीट्विटरवरून अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांना श्रद्धांजली वाहिली. अभिनेत्री सोनाली बेंद्रे सध्या हायग्रीड कॅन्सरशी झूंज देत असून तिच्यावर न्यूयॉर्कमध्ये उपचार सुरु आहेत. सोनाली आणि तिचा नवरा गोल्डी बहल सोशल मीडियावरून तिच्या प्रकृतीची माहिती देत असतात. ही बातमी कळताच चाहते सोनालीच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत. अशातच सोशल मीडियावर सोनाली बेंद्रेच्या निधनाची अफवा पसरली आहे.
घर फिरले कि घराचे वासे फिरतात असे काहीसे कदम यांचे झाले असून या ट्विट मुळे पुन्हा ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

Review