आव्हाने स्वीकारण्याची,नवीन प्रयोग करण्याची ज्यांच्यामध्ये क्षमता असणाऱ्यांना कला क्षेत्रात अनेक संधी -भाऊसाहेब भोईर
पिंपरी (सह्याद्री बुलेटिन ) - सांस्कृतिक व कला क्षेत्रात जीवघेणी स्पर्धा आहे. परंतू आव्हाने स्वीकारण्याची आणि नवीन प्रयोग करण्याची ज्यांच्यामध्ये क्षमता आहे. त्यांना या क्षेत्रात अनेक संधी आहेत, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड नाट्य परिषदेचे अध्यक्ष,नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी केले.
‘स्वर रंग’ या संस्थेच्या ‘स्वामी समर्थ दाता’ या ऑडिओ, व्हिडीओ अल्बमचे गुरुवारी पिंपरीत भोईर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी पार्श्वगायिका पूजा पांचाळ, संगीतकार – निर्माता लहु पांचाळ, सहनिर्माता पोपट नखाते, माजी नगरसेवक प्रमोद ताम्हणकर, उद्योजक दीपक मेवाणी, सामाजिक कार्यकर्ते अमर कापसे, पिंपरी-चिंचवड कलाकार महासंघाचे अध्यक्ष विजय उलपे, रामचंद्र गोरे, सतिश मोटे, डॉ. अनिकेत अमृतकर, संकल्प गोळे, राखी चौरे, संयोजक चिंतन मोडा, कॅमेरामन सागर मोरे, श्रीधर मोरे आदी उपस्थित होते.
संगीतकार – निर्माता लहु पांचाळ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सुत्रसंचालन व आभार अमर कापसे यांनी मानले.