विद्यार्थीप्रिय शिक्षकाचा जिल्हास्तरीय गुणवंत पुरस्काराने सन्मान... उत्तम जावळे सर यांच्या कार्याचा गौरव...

पुणे (सह्याद्री बुलेटीन ) - विद्यार्थी प्रिय अध्यापक उत्तम जावळे सर यांच्या शैक्षणिक आणि  सामाजिक कार्याची दखल घेऊन,  पुणे जिल्हा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाच्या वतीने दिला जाणारा "जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार" त्यांना डॉ सागर देशपांडे ( संपादक- जडण घडण) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शुक्रवार दि. ७ रोजी पद्मावती येथील अण्णाभाऊ साठे सभाग्रहात हा सत्कार सोहळा संपन्न झाला
विद्यार्थीप्रिय शिक्षकाचा जिल्हास्तरीय गुणवंत पुरस्काराने सन्मान... प्रा. उत्तम जावळे यांच्या कार्याचा गौरव...
1995 पासून जावळे सर,  श्री सिद्धेश्वर विद्यालय, पिंपळगाव. येथे अध्यापन विभागात कार्यरत आहेत. ते मराठी, विज्ञान, समाजशास्त्र, शारीरिक शिक्षण, स्वसंरक्षण या विषयांचे अध्यापन करतात. मार्च 2018 मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेत त्यांच्या विषयाचा निकाल शंभर टक्के आहे.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी तर ते प्रयत्न  करतातच पण त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठीही ते अग्रेसर आहेत. 
 
शिक्षक म्हणजे केवळ शिकवणे या मर्यादेत न राहता ते स्वतः सर्व सामाजिक कार्यात भाग घेऊन विद्यार्थ्यांना प्रेरणा देतात. याच बरोबर विद्यालयात भौतिक कार्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. विद्यालयांमध्ये शालेय, सहशालेय उपक्रम राबवून यामध्ये त्यांचा सतत पुढाकार असतो. विद्यार्थ्यांना नवनवीन गोष्टींचे ज्ञान होण्यासाठी ते करिअर मार्गदर्शन व विषय अध्यापन करतात. पी. पी. टी. इंटरनेट सारख्या अद्ययावत साधनांचा वापर करून त्यांनी आपलं कार्य आधुनिक बनवलेलं आहे. ते विद्यार्थ्यांचा आणि शाळेचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सतत जागृत असतात. अशा विद्यार्थी प्रिय, समाजकार्याभिमुख आणि गुणवंत शिक्षकाला हा पुरस्कार मिळाला आहे.
 
"हा सन्मान माझा नसून, आमचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक सहकारी, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि सर्व पालकांचा आहे, या पुरस्काराने जबाबदारी वाढली आहे. या सर्वांच्या सहकार्यानेच सिद्धेश्वर विद्यालयाच्या यशाचा आलेख असाच वाढत जाईल.
--- पुरस्कार मुर्ती उत्तम जावळे सर...

Review