बाहुबली, जय मल्हार, पांडुरंग यांच्या रूपातील गणपतींना बाजारात मागणी...
पुणे (सह्याद्री बुलेटिन) - गणेशोत्सवाची धामधूम सुरु आहे.मंगलमय वातावरणात गणेश आगमन होत आहे. दर वर्षीप्रमाणे या वर्षीही बाहुबली, जय मल्हार, पांडुरंग यांच्या रूपातील गणपतींना विशेष मागणी आहे. या बहुतेक मूर्ती महाराष्ट्रातील पेण येथे बनतात.पेण शहराला गणेशमुर्तीकलेचा १५० वर्षांचा इतिहास लाभला आहे. पेण मध्ये प्लास्टर ऑफ पॅरीस आणि शाडूच्या मातीच्या गणेश मुर्ती मोठ्या प्रमाणात तयार करण्यात आल्या आहेत. दगडूशेठ, लालबागचा राजा, सिध्दीविनायक, पेशवाई मुर्तीना सालाबाद प्रमाणे यावर्षीही मोठी मागणी आहे. मात्र विठूमाऊलीच्या रुपातील गणपती आणि वसईच्या राज्याच्या रुपातील गणेश मुर्तीना यावर्षी सर्वाधिक मागणी होते आहे. या शिवाय बालगणेशाच्या मुर्तीनाही ग्राहकांच्या पसंतीला उतरत आहेत.
आकर्षक रंगसंगती आणि सुबक मुर्ती ही पेणच्या गणेश मुर्तीची वैशिष्ट असून यावर्षी जवळपास २५० प्रकारच्या गणेश मुर्ती विक्रीसाठी पाठवण्यात आल्या आहेत.