गृहनिर्माण सोसायट्यांना शासन मदत करणार
पुणे (सह्याद्री बुलेटिन) - महाराष्ट्रातील गृहनिर्माण सोसायट्या "महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या " सभासद झाल्यास त्यांना पुनर्विकासासाठी अल्प व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्याची घोषणा सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी रविवारी पुणे येथे केली. त्यासाठी अधिकाधिक सोसायट्यांनी महामंडळाचे सदस्य होऊन भागभांडवल जमा करण्याचे आवाहन देशमुख यांनी केले. सहकार विभाग, सहकारी गृहनिर्माण संस्था फेडरेशन आणि आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांच्या वतीने रविवारी आयोजित सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी आमदार कुलकर्णी, सहकार आयुक्त डॉ. विजय झाडे, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त मधुकर चौधरी, मिलिंद आकरे आदी उपस्थित होते.