दोन मोटरसायकल व ट्रकच्या विचित्र अपघातात युवकाचा जागीच मृत्यू, दोघे जखमी.

कोल्हार (सह्याद्री बुलेटिन)साईप्रसाद कुंभकर्ण - राहाता तालुक्यातील कोल्हार येथील नवीन पुलालगत दोन मोटरसायकल व ट्रकच्या विचित्र अपघातात ट्रकच्या पुढील चाकाखाली येऊन युवकाचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा मित्र व आणखी एक वाहन चालक गंभीर जखमी झाला.
बाळासाहेब माधव काळे (रा. वडगाव ता. संगमनेर ) यांचा या अपघातात मृत्यू झाला असून सोमनाथ काळे आणि भारत मेहेत्रे (रा.राऊत वाडी, राहुरी ) हे जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी साडेतीनच्या सुमारास नवीन पुलावरून नगरहून कोल्हार कडे जात असलेली मोटरसायकल (क्रमांक एम एच १७ एआर 969 )ची बाबळेश्वर ऊन नगरकडे जाणाऱ्या मोटर सायकल ला (क्रमांक एम एच १७ बीई 5638 )याला जोरदार धडक बसल्याचे समजते. धडकेनंतर मोटरसायकलस्वार समोरून येणाऱ्या ट्रकच्या (क्र टी एन 28 पी १४४४) पुढच्या चाका खाली फेकला गेल्याने मोटर सायकल स्वार बाळासाहेब माधव काळे हा जागीच ठार झाला.

तर मागील बाजूस बसलेला त्यांचा सहकारी सोमनाथ काळे उडून बाजूला पडल्याने बचावला दरम्यान दोन्ही मोटरसायकलच्या धडकेत भारत मेहेत्रे (राऊत वाडी तालुका राहुरी )हा गंभीर जखमी झाला त्याला तातडीने रुग्णवाहिकेतून नगरला हलविण्यात आले. दरम्यान तिन्ही वाहनच्या धडके नंतर मोठा आवाज झाल्याने जवळ असणारे कोल्हार चे माजी उपसरपंच स्वप्निल निबे घटनास्थळी धावले, सोबत आणखी युवकांनी अपघातग्रस्तांना मदत केली, घटनेनंतर अवघ्या काही मिनिटात नवीन पुलावर कर्तव्य बजावीत असलेले पोलीस कॉन्स्टेबल वढणे घटनास्थळी आले, त्यानंतर पोलीस हेडकॉन्स्टेबल फुलारी व लोणी पोलिस स्टेशनचे स. पो. नि. प्रल्हाद पाटील घटनास्थळी दाखल झाले.

Review