मनसेने पिंपरीत रोखला ग्रे़डसेपरेटर : पोलिसांकडून 13 मनसैनिकांना अटक
पिंपरी : (सह्याद्री बुलेटिन ) पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने आज (सोमवारी) भारत बंद पुकारला आहे. या बंदला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुद्धा पाठिंबा दिला असून राज्यभरात मनसेने आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला आहे.
पिंपरीत देखील मनसे पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात आक्रमक झाली आहे. मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी महापालिका भवनासमोर पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग रोखून धरला. ग्रेडसेपरेटरमध्ये कार्यकत्यांनी ठिय्या आंदोलन करीत पुण्यावरुन निगडीकडे जाणारी वाहने मनसेने रोखून धरली.
पोलिसांनी यावेळी सचिन चिखले यांच्यासह अश्विनीताई बांगर, सीमा बेलापुरकर, अदिती चावरीया, स्नेहल बांगर, रुपालीताई गिलबिले, अनिता पांचाळ, शोभा चावरीया, मयुर चिंचवडे, अक्षय नाळे, दत्ता देवतरासे, विशाल मानकरी, नितीन चव्हाण यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.