बेटी बचावोचा संदेश देणा-या गणेश मंडळांसाठी स्पर्धा

पिंपरी (सह्याद्री बुलेटीन) -पिंपरी चिंचवड शहर जिल्हा बेटी बचाव जनआंदोलनाच्या वतीने पिंपरी-चिंचवड जिल्ह्यातील येणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव* मध्य े'बेटी बचाओ'चा संदेश देणारी भव्य स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे, अशी माहिती भाजपा जिल्हा संयोजक (बेटी बचाओ बेटी पढाओ) व राष्ट्रीय पुरस्कार विजेता अमित गुप्ता यांनी केले.

स्पर्धेच्या सार्वजनिक गणेशोत्सव मध्ये सजावट/देखावे,LCD, नाटकं, पथनाट्ये, स्पर्धाद्वारे बेटीबचाओ चा संदेश देणें या गटातून पिंपरी-चिंचवड जिल्ह्यामधून तीन मंडळे निवडली जातील आणि त्यांना प्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषिक दिले जाईल.
दुस-या गटात सार्वजनिक गणेशोत्सव मध्ये विसर्जन मिरवणुकीत बेटीबचाव चा सर्वोत्कृष्ट संदेश देण्यात येणाऱ्या पिंपरी-चिंचवड जिल्ह्यातील तीन मंडळाची निवड करण्यात येईल आणि त्यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात येईल. तर तिस-या गटात घरी बसविण्यात येणाऱ्या गणपतीची सजावटी/विसर्जन मिरवणुकीत सर्वोत्कृष्ट बेटी बचावचा संदेश देणाऱ्या तीन कुटुंबाना अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात येईल.

गेल्या काही वर्षांत भारतामध्ये मुलीचं इतिहासातील मोठे हत्याकांड घडले आहे. प्रचंड मोठा रक्तपात घडला आहे.भारतीय आर्थिक सर्वेक्षण (2017-2018) प्रमाणे गेल्या दहा वर्षात भारतात 6 कोटी 30 लाख मुलींच्या गर्भात हत्या झाल्या आहेत.
यासाठी आपण सर्वांनी मिळून एकत्रित लढा सुरू केला आहे.ही परिवर्तनाची लढाई आहे.आणि यावेळच्या सार्वजनिक गणेशोत्सव मध्ये आपण मुलींवरचे हे संकट दूर करण्यासाठी श्रीगणेशाचीच मदत घेणार आहोत.

स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी कोणतीही प्रवेश फी असणार नाही. स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी नोंदनी beti.bbbp19@gmail.com
मंडलाचे नाव, मंडलाध्यक्ष नाव, पत्ता, मोबाइल नंबर मेल करा व व्हिडियो 9096958470 या क्रमांकावर व्हॉट्सअप करा तसेच, बेटी बचाव जनआंदोलनाचे मुख्य तत्त्व आहे की मुलगी वाचवा च्या फक्त घोषणा न देता समाजातील प्रत्येक घराने आपापल्या क्षेत्रात मुलींसाठी योगदान द्यावे. त्यामुळे मंडळांनी बेटी बचाओ संदेश देताना,मुलगी वाचावा म्हणून फक्त पालकांना उपदेश न करता समाजातील सर्व घटकांनी समाजातील सर्व मुलींसाठी कसे योगदान देता येईल याविषयी मार्गदर्शन देणारे वेगवेगळ्या कल्पना सुचवाव्यात, असे आवाहन भाजपा जिल्हा संयोजक (बेटी बचाओ बेटी पढाओ) व राष्ट्रीय पुरस्कार विजेता अमित गुप्ता यांनी केले.

Review