सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांचा लाखो रुपये खाणारा पीए...मंत्री गप्प...कामे ठप्प

सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या पीएने आश्रम शाळेला मान्यता व अनुदानाबाबतची फाईल मंजूर करण्यासाठी १० लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप शिक्षण संस्थाचालक अरुण निटुरे यांनी केला आहे.
आश्रम शाळेसंदर्भातील एक फाईल मंत्रालयात अडकली आहे. मान्यता व अनुदानाबाबतची ही फाईल असून ही फाईल गेल्या तीन वर्षांपासून पुढे सरकली नाही, असे निटुरे यांचे म्हणणे आहे. केशेगाव येथे हि आश्रमशाळा आहे.निटुरे हे शुक्रवारी मंत्रालयात बडोले यांच्या कार्यालयात गेले होते. कार्यालयात संबंधित अधिकाऱ्याने निटुरे यांच्याशी वाद घातला. पैसे देऊनही काम होत नसल्याने संताप अनावर झाला, संतापाच्या भरात निटुरे यांनी संबंधित अधिकाऱ्याला मारहाण केली.
या प्रकरणावर मंत्री महोदय मात्र गप्प आहेत. अशा पद्धतीने जर काम होत असेल तर सामान्य जनतेने काय करायचे ? हा प्रश्न अनुत्तरित राहतो.

Review