वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकाला सहा महिने कैद आणि बरच काही... पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांचे आदेश....

पिंपरी (सह्याद्री बुलेटिन) - वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून अपघाताला आमंत्रण देणाऱ्या, तसेच स्वत:सह दुसऱ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांनी कडक पावले उचलायला सुरुवात केली आहे. आयुक्तांनी याबाबत संबंधीत पोलिसांना आदेश दिले आहेत.या आदेशामध्ये वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करुन वाहतुकीच्या विरुध्द दिशेने वाहन चालवून स्वत:सह दुसऱ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या वाहन चालकांवर भारतीय दंड संहिता कलम २७९ प्रमाणे गुन्हा दाखल करुन कारवाई करण्यास सांगितले आहे. कलम २७९ अनुसार नियम मोडणाऱ्या वाहनचालकाला सहा महिने कैद आणि एक हजार रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन आयुक्त पद्मनाभन यांनी केले आहे.
आयुक्त पद्मनाभन शहरात आल्यापासून अनेक कडक कायदे करायला सुरुवात केली आहे. लवकरच याचे परिणामही दिसू लागतीलअसा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत.

Review