प्राधिकरण सदस्यपदी नगरसेवक, कार्यकर्त्यांना संधी द्या: भाजप नगरसेवक प्रा. केंदळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
पिंपरी(सह्याद्री बुलेटिन) - पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी सदाशिव खाडे यांची नियुक्ती झाली आहे. त्यानंतर प्राधिकरण हद्दीतील नगरसेवक आणि कार्यकर्त्यांची प्राधिकरणाच्या समितीवर निवड करण्याची मागणी भाजप नगरसेवक उत्तम केंदळे यांनी केली आहे.
केंदळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविले आहे. त्यात म्हटले आहे की, सन १९७२ मध्ये पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची स्थापना करणेत आलेली आहे. नवनगरविकास प्राधिकरण स्थापन झालेपासुन त्याचा विकास करत असताना या भागातील नागरिकांना घरे, प्लॉट, सोसायटीमधिल फ्लॅट, गाळे, व्यापारी भुखंड, व्यापारी गाळे देण्यात आले आहे. त्यामुळे या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती वाढलेली आहे व या लोकवस्तीला आवश्यक असणा-या मुलभूत सोयी सुविधा पुरविण्याचे कामकाज देखिल प्राधिरकरणामार्फत केले गेले.
बारा वर्षानी प्राधिकरणला अध्यक्ष निवड झाली. अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. ते निराकरण करण्यासाठी समिति वरील सदस्याला प्राधिकरण बाबत असणाऱ्या समस्या व अडचणी माहिती पाहिजे. प्राधिकरणाच्या काही क्षेत्रातील साडेबारा टक्के भूमि पुत्रांचा परतावा प्रश्न, संरक्षित क्षेत्र, रेडझोन, अनधिकृत बांधकामे, हस्तांतरण, बक्षीस पत्रावर केलेले व्यवहार असल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत.
या भागातील विकासकामे करण्यासाठी काही अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे प्राधिकरणाच्या सदस्पदी प्राधिकरण हद्दीतील रहिवासी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांची निवड करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.