जेटली आणि मल्ल्या, क्या हाल है ! गोलमाल है भाई सब गोलमाल है !
भारत सोडण्यापूर्वी आपण अर्थमंत्र्यांची भेट घेतली होती - मद्य व्यापारी विजय मल्ल्या
भारत सोडण्यापूर्वी तडजोडीसाठी आपण अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली होती - विजय मल्ल्या
मी मल्ल्या यांची भेट घेतलेली नाही किंवा कधी वेळही दिलेली नाही. त्यामुळे त्यांची भेट घेण्याचा प्रश्नच नाही,- अरुण जेटली
ते जेव्हा राज्यसभा सदस्य होते. तेव्हा ते अपवादत्मकरित्याच संसदेत येत. ते एकदा संसदेच्या कामकाजावेळी अनौपचारिकत्या माझ्या खोलीकडे आले होते. त्यावेळी त्यांनी तडजोडीसाठी एक प्रस्ताव तयार करत असल्याचे सांगितले. हे बोलणे पुढे नेण्यापूर्वी मी त्यांना त्यांच्या यापूर्वीच्या प्रस्तावाबाबत आठवण करून दिले. मी मल्ल्यांना म्हणालो, माझ्यासमोर प्रस्ताव ठेवण्यात काहीच अर्थ नाही. त्यांनी हे आपल्या बँकांसमोर ठेवले पाहिजे. इतकेच काय त्यावेळी त्यांनी जी कागदपत्रे आणली होती. तीही मी घेतली नाहीत.- अरुण जेटली
मल्ल्या म्हणतात भेट घेतली, जेटली म्हणतात नाही, मग कोणीतरी दावा करते कि मी यांना भेट घेतांना पहिले, मग जेटली म्हणतात ते राज्यसभेचे खासदार होते तेव्हा भेट झाली, पुन्हा मानतात कि त्यांनी कागदपत्रे दिली पण मी घेतली नाही, मला देण्यापेक्षा बँकेला द्या...वैगरे....
काय समजायचे ते समजून घ्या...