एलजीबीटी समुदायाला पाठिंबा देण्यासाठी क्रिकेटपटू गौतम गंभीर चा महिला वेष...
एलजीबीटी समुदायाला पाठिंबा देण्यासाठी क्रिकेटपटू गौतम गंभीर यानेही आपली भूमिका एका वेगळ्या मार्गाने मांडली. विविध विषयांवर आपल्या ठाम भूमिका मांडणाऱ्या गौतमने तृतीयपंथीयांना पाठिंबा देण्यासाठी म्हणून डोक्यावर पदर घेऊन, कपाळावर टिकली लावून महिलांचा वेश धारण करत सर्वांनाच थक्क केलं.नवी दिल्ली येथे पार पडलेल्या हिजडा हब्बाच्या सातव्या पर्वाच्या अनावरणाच्या वेळी त्याने हजेरी लावली होती. त्याचवेळी त्याचं हे रुप पाहायला मिळालं. एचआयव्ही एड्स एलायन्स इंडियातर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ज्यामध्ये ‘बॉर्न धीस वे’ अशी थीमही ठेवण्यात आली होती. या कार्यक्रमात गंभीरने घेतलेली ही भूमिका आणि तृतीयपंथीयांच्या समर्थनार्थ त्याने हे पाऊल उचलले.