अर्जुन तेंडुलकरची मुंबईच्या संघात निवड

भारताच्या १९ वर्षाखालील संघाकडून पदार्पण केल्यानंतर, भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन याची जे. वाय. लेले निमंत्रीतांच्या वन-डे मालिकेसाठी अर्जुनची मुंबईच्या संघात निवड झालेली आहे. काही दिवसांपूर्वीच या संघाची घोषणा करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी सुवेद पारकर या तरुण खेळाडूकडे मुंबईच्या संघाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. १६ सप्टेंबरपासून वडोदऱ्यात या स्पर्धेला सुरुवात होणार असून कर्णधार सुवेद पारकर याच्या नेतृत्वाखाली दिव्यांश सक्सेना, करण शहा, प्रज्ञेश कानपिळेवार, हर्षित दाफेदार, अर्स्लान शेख, यश साळुंखे, केसरसिंह थापा, वैभव कळमकर, अथर्व अंकोलेकर, भुषण जलावडकर, प्रफुल्ल देवकाते, अर्जुन तेंडुलकर, उझेर खान, बलवंत सिंह सोधा आणि सक्षम पराशर यांचा समावेश आहे.

Review