धक्कादायक: अजूनही होत आहेत बेकायदा गर्भपात - सांगलीतील चौघुले रुग्णालयातील प्रकार
सांगली येथील चौगुले रुग्णालयामध्ये ६ बेकायदा गर्भपात झाल्याचे उघडकीस आले आहेत. पोलीस आणि वैद्यकीय विभागाने रुग्णालयावर धाड टाकून डॉ. रुपाली चौगुले यांना ताब्यात घेतले आहे.
सांगली महापालिकेच्या आरोग्य विभाग आणि पोलिसांनी मिळून संयुक्तरीत्या चौगुले हॉस्पिटलवर छापा टाकला आहे. गेल्या एक वर्षापासून विनापरवाना गर्भपात करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. संशयास्पद कागदपत्रे आणि औषधे आढळून आली आहेत. हॉस्पिटलच्या कागदपत्रांची तपासणी केली असता या ठिकाणी सहा गर्भपात केल्याचे समोर आले आहे. आणखी किती बेकायदा गर्भपात करण्यात आले याचा तपास सुरू आहे. या प्रकरणी डॉक्टरासह तिघा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.