तो मी नव्हेच, निरव मोदी आणि राहुल चोक्सी प्रकरणात सीबीआयची भूमिका
हिरे व्यापारी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्या फरार होण्यामागे आमच्या अधिकाऱ्यांचा कोणत्याही प्रकारे हात नाही असं स्पष्टीकरण सीबीआयने शनिवारी दिलं. त्या दोघांबाबत बँकेकडून आमच्याकडे तक्रार आली तेव्हा भारतातून पळून त्यांना महिना उलटला होता. तक्रार आल्यानंतर सीबीआयने तातडीने पावलं उचलायला सुरूवात केली होती. त्यामुळे नीरव मोदी आणि चोक्सीच्या फरार होण्यामागे आमच्या कोणत्या अधिकाऱ्याचा हात असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं स्पष्टीकरण सीबीआयने दिलं आहे.
सीबीआयमधील गुजरात केडरचे अधिकारी ए. के. शर्मा यांनी हिरे व्यापारी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्या पलायनात महत्त्वाची भूमिका निभावली, शर्मा यांनीच मद्यसम्राट विजय मल्या याच्याविरुद्धची लूक-आूट नोटीस कमकुवत केली आणि त्याला देशाबाहेर पळून जाण्यास मदत केली, असा आरोपही राहुल यांनी शनिवारी केला होता. त्यांच्या या आरोपावर सीबीआयने आपली बाजू मांडली आहे.
बँकांचे कर्ज बुडविल्यानंतर मल्या यास देशाबाहेर पसार होण्यास नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मदत केल्याचा आरोप गांधी आणि काँग्रेसने केला आहे. काँग्रेसने जेटली यांच्या राजीनाम्याची मागणी केली असून मल्या कसा पसार झाला त्याची चौकशी करण्याची मागणीही केली आहे.