श्रीमंतांवर कर लावा पण पेट्रोल स्वस्त करा - बाबा रामदेव

'लोकसभा निवडणूक 2019पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कपात करावी लागेल. नाही तर सरकारलाच ही महागाई खूप महागात पडेल', पेट्रोल-डिझेलला जीएसटीच्या 28 टक्क्यांपेक्षा कमी कर प्रणाली अंतर्गत आणले गेले पाहिजे, ''सरकारनं परवानगी दिली तर मी 35-40 रुपयांना पेट्रोल-डिझेल विकेन, करामध्ये सवलत देईन'', किंवा सरकारने ज्यांच्याकडे खूप पैसा आहे, अशा व्यक्तींवर आणखी कर लादावा. असे योगगुरु बाबा रामदेव यांनी म्हटले आहे.
बाबा रामदेव यांनी पंतप्रधान मोदींच्या विकासकामांचंही कौतुक केले.
ते म्हणाले की, ''पंतप्रधान मोदींवर टीका करणं हा जनतेचा मूलभूत अधिकार आहे. मात्र मोदींनी चांगली कामंदेखील केली आहे. त्यांनी क्लिन इंडिया मिशन लाँच केले. त्यांच्या कार्यकाळात कोणताही मोठा घोटाळा झालेला नाही. दरम्यान, सध्या काही राजकीय मंडळी राफेल विमान डीलवरुन प्रश्न उपस्थित करत आहेत''. मोदी सरकारच्या प्रत्येक धोरणांचे, निर्णयांचे जोरदार समर्थन करणारे योगगुरू बाबा रामदेव यांनीही इंधन दरवाढीच्या समस्येवरुन त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

 

Review