गणेश मंडळांना बक्षिसे मिळणार: महापौर, पक्षनेत्यांचे स्पष्टीकरण
पिंपरी (सह्याद्री बुलेटिन ) - सण, उत्सवाबाबत न्यायालयीन निर्णयामुळे खर्चावर मर्यादा आल्याने पिंपरी महापालिकेने सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेचे बक्षिस वितरण अद्याप केले नाही. त्यावर गणेशोत्सवाच्या कालावधीत या सार्वजनिक गणेश मंडळांना बक्षिसे मिळणार, असे स्पष्टीकरण महापौर राहूल जाधव व सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी पत्रकार परिषदेत दिले.
सत्ताधारी भाजपला हा बक्षिस वितरण सोहळ्याचा विसर पडल्याचा आरोप दत्ता साने यांनी केला होता. त्यानंतर महापौर राहूल जाधव यांनी खुलासा केला. ते म्हणाले की, पालिकेच्या खर्चातून सण, उत्सव साजरे करण्यास न्यायालयाच्या निर्णयामुळे अडथळा आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे विलंब झाला आहे. महिनाभरापूर्वीच मंडळांना हा सोहळा होणार असल्याची ग्वाही आपण दिली. त्यामुळे विसर पडल्याच्या आरोपात कसलेही तथ्थ नाही. स्पर्धेतील विजेत्या मंडळांना ठरलेली बक्षिसे गणेशोत्सव काळात मिळतील. त्याचे नियोजन दोन दिवसात केले जाईल.तसेच, धोरणात्मक निर्णय घेतला जाणार असल्याचे ते म्हणाले.