शेतकऱ्यांना हमी भाव न देणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांवरती कठोर कारवाई करा - छावा मराठा युवा महासंघाची मागणी
पिंपरी (सह्याद्री बुलेटीन ) महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक असल्याने आणि पावसामुळे शेतमालाचे प्रचंड नुकसान झाल्यामुळे महाराष्ट्र सरकारने 21 ऑगस्ट 2018 रोजी शेतमाल हमीभावापेक्षा कमी भावाने खरेदी करणाऱ्या संबंधित व्यापारी बाजार समित्यांवरती 50 हजार रुपये दंड आणि एक वर्षाचा कारावास तसेच संबंधितांचा परवाना रद्द करण्याची घोषणा केली होती, पण या समित्यांनी शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारे न्याय दिलेला नाही, किंवा बाजारभावाप्रमाणे शेतमालाची खरेदी केली नाही. त्यामुळे ज्यांनी या नियमाचे उल्लंघन केले अशा कृषी उत्पन्न बाजार समित्यांवरती आणि संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी छावा मराठा युवा महासंघाने पत्रकार परिषदेत केली आहे
यावेळी धनाजी येळकर पाटील, संस्थापक अध्यक्ष छावा मराठा युवा महासंघ, तसेच पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेंद्र देवकर पाटील, पुणे जिल्हा उपाध्यक्ष नानासाहेब फुगे, महिला जिल्हाध्यक्ष हेमलता लांडे, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष राज गोदमगावे, शरद पाटील, योगिता भागणे, गौरव धनवे, सुरज ठाकूर, राजू पवार, सुनिता फुले, मनीषा जाधव आणि स्वाती भोई आदी मान्यवर उपस्थित होते.
छावाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये
21 ऑगस्ट 2018 रोजी महाराष्ट्र सरकारने शेतमाल हमीभावापेक्षा कमी भावाने खरेदी करणाऱ्या संबंधित सर्व व्यापारी आणि बाजार समित्यांवरती 50 हजार रुपये दंड व एक वर्षाचा कारावास तसेच संबंधित परवाना रद्द करण्याच्या घोषणेची अंमलबजावणी करावी,
महाराष्ट्रात जास्तीत जास्त शासकीय खरेदी केंद्र चालू करावे व शेतकऱ्यांचा सर्व शेतमाल खरेदी करावा. 2017 / 18 मधील खरेदी केलेले तूर, हरभरा यांचे बिल अजूनही अदा करण्यात आलेले नाही, ते त्वरित अदा करावे.
ज्या ठिकाणी पावसाने दडी मारली किंवा पावसामुळे नुकसान झाले, येथील शेतमालाचा पंचनामा करून त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
सरकारने अन्नादात्या शेतकऱ्यांना न्याय देऊन त्यांना आधार द्यावा, वरील न्याय मागण्यांची अमंलबजावणी करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा या वेळी देण्यात आला