प्रवरा सांस्कृतिक व क्रीडा महोत्सवामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल – सौ. शालिनीताई विखे पाटील
कोल्हार (सह्याद्री बुलेटिन ) साईप्रसाद कुंभकर्ण - महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये गणेशोत्सव परंपरेचे वेगळे महत्व आहे. सांस्कृतिक एकोपा टिकून रहावा, या उद्देशाने गणेशोत्सवानिमित्त महाराष्ट्र राज्य विधानसभेचे विरोधी पक्ष नेते ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून व मा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साकारलेल्या "एक गाव एक गणपती;प्रवरा सांस्कृतिक व क्रीडा महोत्सवामुळे" ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झालाय,असे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.
शालिनीताई विखे पाटील यांनी केले ."त्या एक गाव एक गणपती; प्रवरा सांस्कृतिक महोत्सवाच्या" उदघाटन समारंभ प्रसंगी बोलत होत्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भगवती माता ट्रस्ट चे सयाजी उर्फ भाऊसाहेब पाटील खर्डे पाटील होते. विखे पाटील पुढे म्हणाल्या "ग्रामीण भागातील विद्यार्थी हुशार असतात, परंतु त्यांना व्यासपीठ आणि प्रेरणा मिळण्याची गरज असते.त्यांच्या कला-गुणांना उत्तेजना मिळावी, ते खेळ आणि सांस्कृतिक नैपुण्य प्राप्त करून राज्य आणि देश पातळीवर चमकावेत हा उदात्त हेतू या महोत्सवाचा आहे. महोत्सवाच्या माध्यमातून प्रवरा परिसरातील विद्यार्थी-विद्यार्थीनीच्या उपजत कलागुणांबरोबर खेळाडूनाही हे व्यासपीठ पर्वणी ठरणार आहे. सर्वांच्या सहकार्याने व सहभागाने गणेशोत्सवाचे वेगळेपण व सांस्कृतिक वारसा जोपासण्याचा प्रयत्न यानिमित्ताने होणार आहे. या प्रसंगी कोल्हार बुद्रुकच्या सरपंच सौ. रिनाताई खर्डे, कोल्हार भगवतीपूर चे सरपंच रावसाहेब खर्डे पाटील हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोल्हार भगवतीपुर केंद्र संमन्वयक प्राचार्य डॉ. संपतराव वाळुंज यांनी केले. यावेळी ज्ञानेश्वर खर्डे पाटील, अशोकराव दातीर, अशोकशेठ असावा, दिनेश बर्डे, भरत पाटील अत्रे, रामदास पाटील देठे, दीपक पाटील, शंकरराव वरखड पाटील, बाबासाहेब दळे, आबासाहेब खर्डे, सुखलाल खर्डे, सुनील पाटील शिंदे, प्रशांत खर्डे, अविनाश भणगे, श्रीकांत पाटील खर्डे, बापुसाहेब देवकर, राजेंद्र खर्डे, नांदुमामा खांदे, स्वप्नील निबे, धनंजय दळे, बाळासाहेब राऊत, विलासराव खर्डे, गोपिकताई दळे, अनिल खर्डे, सुनील बोरुडे, अमोल थेटे, प्राचार्य खंडागळे, निर्मळ, डेंगळे, गोरक्षनाथ खर्डे, श्रीमती कदम, चव्हाण, चिंधे, काळे, सर्व ग्रामस्थ, पंचक्रोशीतील महिला, विद्यार्थी, उत्साही तरुण,

भजनी मंडळी, ज्येष्ठ नागरिक, शिक्षक, शिक्षेकतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध गुणदर्शन कार्यक्रमात कोल्हार केंद्रातील इंग्लिश मीडियम स्कुल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालय, भगवतीमता विद्यामंदिर, प्रवरा माध्यमिक विद्यालय, प्रवरा विद्यानिकेतन , रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कुल इत्यादी च्या २०६ मुले-मुली नि वैयक्तिक,गायन, सामूहिक नृत्य, नाटिका, लावणी, पोवाडा गायन केले. विविध गुणदर्शन कार्यक्रमातून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पारितोषिक प्राप्त स्पर्धकांना प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. परीक्षक म्हणून डॉ. नवनाथ शिंदे, प्रा.शशिकांत शिंदे. प्रा. आर चितळकर यांनी काम पाहिले. आभार प्रा. इलग यांनी आभार मानले.