‘गली गली में शोर है, हिंदुस्तान का चौकीदार चोर है’ - राहुल गांधींची मोदींवर टीका

९ हजार कोटी रुपयांची चोरी करुन विजय मल्ल्या पळून जातो तेव्हा तो देशाच्या अ‘गली गली में शोर है, हिंदुस्तान का चौकीदार चोर है’ - राहुल गांधींची मोदींवर टीकार्थमंत्र्यांची भेट घेऊन जातो. हे मी नव्हे तर खुद्द अर्थमंत्री अरुण जेटलींनीच सांगितले असून मल्या लंडनमध्ये असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे, ‘गली गली में शोर है, हिंदुस्तान का चौकीदार चोर है’ अशा शब्दांत राहुल गांधी यांनी मोदींवर कडवी टीका केली. 

राजस्थान विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या दौऱ्यावर असलेल्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. डूंगरपूर येथील सगवाडात एका जाहीर सभेत ते बोलत होते.
राजस्थानातील भाजपा सरकारवर हल्लाबोल करताना राहुल म्हणाले, भाजपाच्या गौरव यात्रेचा पैसा जनतेच्या खिशातून काढला जात आहे. दरम्यान, स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन देताना ते म्हणाले, एके दिवशी तुम्ही तुमच्या फोनच्या मागे ‘मेड इन राजस्थान’ किंवा ‘डुंगरपूर’ लिहीलेले पहाल. यावेळी त्यांनी विधानसभेत महिलांचे नेतृत्व वाढीबाबतही भाष्य केले. निवडणुकांमध्ये महिलांची संख्या जास्तीत जास्त पहायला मिळावी कारण भारतात त्यांच्याशिवाय काहीही होऊ शकत नाही, असे ते म्हणाले.

Review