जालन्याच्या जाळ्यामध्ये भिडणार दोन भिडू ! रावसाहेब विरोधात बच्चू - दानवे विरोधात कडू !!
आमच्या शेतकऱ्यांना साले म्हणता काय ? तुम्हाला जालन्यातूनच पराभवाची धूळ चारतो, अशी गर्जना करत अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी जालन्यातून लोकसभा लढवण्याची तयारी सुरू केली आहे. रावसाहेब दानवे यांनी दीड वर्षापूर्वी शेतकऱ्यांचा साले असे म्हणत त्यांच्यावर शेरेबाजी केली होती. शेतकऱ्यांच्या हितासाठी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं.रावसाहेब दानवे यांच्या मतदार संघाची अवस्था बिहारपेक्षा वाईट आहे. तिथे रेती तस्करी चालते, बेकायदा दारू विक्रीमध्ये रावसाहेब दानवेंचा सहभाग आहे.असा आरोप करत रावसाहेब दानवेंवर कडाडून टीका केली.
लोकसभा निवडणुका समोर आहेत, अशात आपण जालना मतदार संघातून लढण्याची तयारी सुरु केली आहे. या निवडणुकीत रावसाहेब दानवे पराभूत केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.
जालना हा रावसाहेब दानवेंचा गड मनाला जातो. याच गडात शिरकाव करण्याचा प्रयत्न कडू करत आहेत . कडूंची गर्जना प्रत्यक्षात उतरते कि हवेत विरते हे येणार काळच ठरवेल.