वृक्षसंवर्धनाच्या कार्यासाठी अण्णा जोगदंड यांचा मराठवाडा भुषण पूरस्काराने सन्मान
पिंपरी (सह्याद्री बुलेटिन ) - मराठवाडा चँरीटेबल ट्रस्ट एकसंघ समिती पिंपरी चिंचवड पुणे यांच्या वतिने आयोजित 70 व्या मराठवाडा मुक्ती दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेचे संचालक तथा शक्षराध्यक्ष आण्णा जोगदंड यांना "वृक्षसंवर्धन मित्र, मराठवाडा भुषण" पुरस्काराने कामगार मंत्री संभाजीराव निलंगेकर यांच्याहस्ते गौरविण्यात आले.
यावेळी आमदार महेश लांडगे, ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोत्तापल्ले, नवनगर प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर, माजी आमदार शिवाजी कवेकर, माजी उपमहापौर शैलजा मोरे, नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन, अंबरनाथ कांबळे, शारदा सोनवणे, कमल घोलप, भीमाबाई फुगे, आशा शेंडगे, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार आदी उपस्थित होते.
पुरस्काराविषयी बोलताना आण्णा जोगदंड म्हणाले, विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाचा नाश केला जात आहे. औद्योगिक क्षेत्रातून व बदलत्या राहाणीमान यामुळे नैसर्गिक स्रोत दुषित केला जात आहे. वाढती लोकसंख्या यामुळे नागरी सुविधा , दळणवळणाकरीता मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केली जात आहे. देहुरोड-निगडी दरम्यान सहा कि.मी. रस्तारुंदीकरणासाठी शेकडो वर्ष जुनी असलेली वडाच्या झाडाबरोबरच विविध झाडे तोडण्याला विरोध केला. तोडलेल्या झाडाच्या बदल्यात ६८३ वृक्ष नव्याने लावून त्याची दोन वर्ष संगोपन व संवर्धन करण्याची जबाबदारी शासनाला आमच्या पाठपुराव्यामुळे घ्यावी लागली. याच प्रयत्नासाठी पुरस्कार मिळाल्याने आणखी काम करण्यासाठी प्रेरित केल्याचे ते म्हणाले.