विसर्जन मिरवणुकीसाठी पुण्यातील वाहतुकीत बदल: पोलिसांचा राहणार चोख बंदोबस्त

पुणे (सह्याद्री बुलेटिन ) - पुण्याच्या गणेशोत्सवाची विसर्जन मिरवणूक रविवारी (दि. २३) सकाळी दहा वाजेपासून सुरू होणार आहे. ही मिरवणूक शांततेत व विनाअडथळा पार पडावी, यासाठी तब्बल पावणेआठ हजार पोलीस खडा पहारा देणार आहेत, तर १ हजार २५० सीसीटीव्हींवरून गर्दीवर नजर ठेवली जाणार आहे. त्याचबरोबर बॉम्बशोधक व नाशक पथक, छेडछाड व चोरी विरोधी पथकही तैनात केले जाणार आहे. शहरामध्ये दोन हजार गणेश मंडळे आहेत, त्यापैकी ६०० मंडळे मुख्य विसर्जन मिरवणूक मार्गावर सहभागी होणार आहेत.
पुणे शहरातील विसर्जन मिरवणुकीच्या बंदोबस्तामध्ये चार अतिरिक्त आयुक्त, १३ उपायुक्त, ३२ सहायक आयुक्त, १४७ पोलीस निरीक्षक, ४४७ उपनिरीक्षकांसह ७ हजार २९ कर्मचारी सहभागी असणार आहेत. त्याचसोबत एसआरपीएफच्या दोन कंपन्यांमधील २०० जवान, ३५० होमगार्ड, तसेच वज्र, वरुण ही दंगलरोधक पथके मदतीला तयार असणार आहेत.
 
वाहतुकीसाठी बंद रस्ते (२३ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ दरम्यान ते मिरवणूक संपेपयंर्त) पुढीलप्रमाणे -
शिवाजी रस्ता-काकासाहेब गाडगीळ पुतळा ते जेधे चौक (स्वारगेट), लक्ष्मी रस्ता- संत कबीर पोलीस सnौकी (नाना पेठ) ते टिळक चौक, बाजीराव रस्ता- बजाज पुतळा चौक ते फुटका बुरूज चौक, कुमठेकर रस्ता- टिळक चौक ते चितळे कॉर्नर चौक, केळकर रस्ता- बुधवार चौक ते टिळक चौक, टिळक रस्ता- जेधे चौक ते अलका टॉकिज चौक, जंगली महाराज रस्ता- झाशीची राणी लक्ष्मीबाई चौक ते खंडुजी बाबा चौक, लाल बहादूर शास्त्री रस्ता- सेनादत्त पोलीस चौकी ते अलका टॉकिज चौक, गणेश रस्ता- दारूवाला पूल ते जिजामाता चौक, बगाडे रस्ता- सोन्या मारुती चौक ते फडके हौद चौक, गुरुनानक रस्ता- देवजीबाबा चौक ते हमजेखान चौक ते गोविंद हलवाई चौक, कर्वे रस्ता- नळ स्टॉप चौक ते खंडुजी बाबा चौक, फर्ग्युसन कॉलेज रस्ता- खंडुजी बाबा चौक ते फर्ग्युसन कॉलेज मुख्य प्रवेशद्वार, भांडारकर रस्ता- पीवायसी जिमखाना ते गोखले चौक ते नटराज चौक, पुणे-सातारा रस्ता- व्होल्गा चौक ते जेधे चौक, सोलापूर रस्ता- सेव्हन लव्हज चौक ते जेधे चौक, प्रभात रस्ता- डेक्कन पोलीस स्टेशन ते शेलारमामा चौक.
वाहतूक पोलिसांकडून विसर्जनानिमित्त यंदाही वाहनचालकांसाठी वर्तुळाकार मार्ग योजना राबविण्यता आली आहे. वर्तुळाकार मार्ग पुढीप्रमाणे-
कर्वे रस्ता, नळस्टॉप चौक, विधी महाविद्याालय रस्ता, सेनापती बापट रस्ता, गणेशखिंड रस्ता, वेधशाळा चौक, संचेती रुग्णालय, शाहीर अमर शेख चौक, मालधक्का चौक, बोल्हाई चौक, नरपतगिरी चौक, नेहरू रस्ता, संत कबीर चौक, ढोले पाटील चौक (सेव्हन लव्हज चौक), वखार महामंडळ चौक, शिवनेरी रस्ता, गुलटेकडी, मार्केटयार्ड, सातारा रस्ता, होल्गा चौक, मित्रमंडळ चौक, सिंहगड रस्ता, लालबहाद्दूर शास्त्री रस्ता, सेनादत्त पोलीस चौकी, म्हात्रे पूल, नळस्टॉप चौक.
 
लक्ष्मी रस्त्यावर जादा बंदोबस्त.
लक्ष्मी रस्ता, केळकर रस्ता, टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता, कर्वे रस्ता आणि लष्कर भागातील रस्ता या सहा मार्गांसाठी मोठा बंदोबस्त ठेवला आहे. यासाठी २८ सहायक आयुक्त, ८५ पोलीस निरीक्षक, २४१ उपनिरीक्षक आणि २ हजार ६५० कर्मचारी असणार आहेत. मुख्य मिरवणूक मार्गातील लक्ष्मी रस्त्यावर ५२ सीसीटीव्ही, कुमठेकर रस्त्यावर २१, केळकर रस्त्यावर ३३, टिळक रस्त्यावर ३२ आणि शिवाजी रस्त्यावर १६९ असे एकूण सीसीटीव्ही आहेत. .
 
सोमवारी दुपारनंतर रस्ते होणार खुले .
विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी राज्य व परराज्यातून मोठ्या संख्येने नागरिक विसर्जन मार्गावर गर्दी करतात. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मध्यभागातील सतरा रस्ते वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. वाहतूक बदल विसर्जन मिरवणुकीचा समारोप होईपयंर्त लागू राहणार आहेत. सोमवारी दुपारनंतर शहरातील रस्ते वाहतुकीसाठी खुले करून देण्यात येईल किंवा ज्या मार्गावरील मिरवणुकीचा समारोप झालेला असेल तो मार्ग तातडीने वाहनचालकांसाठी खुला करून देण्यात येईल, असे वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Review