दिल्लीतील उच्च शिक्षित खंडणीखोर वाकड पोलिसांनी केले गजाआड...

फेसबुकच्या माहितीच्या आधारे महिलेला खंडणी मागणारे दोन खंडणीखोर वाकड पोलिसांनी गजाआड केले आहेत. रोहित यादव आणि अभिनव मिश्रा अशी या दोघांची नावं आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरातील व्यावसायिकाच्या पत्नीला ५ लाख रुपयांच्या खंडणीचा फोन १९ तारखेला आला होता.पैसे दिले नाहीत तर मुलीचे अपहरण करू अशी धमकी उच्चशिक्षित आरोपीने दिली होती.त्यामुळे घरातील सर्वच घाबरले होते.संबंधित महिलेने तातडीने वाकड पोलीस ठाणे गाठत अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल केला.त्यानुसार वाकड पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली.
रोहित यादव (वय-२८ रा.नवी दिल्ली) आणि अभिनव मिश्रा (वय-२७ रा.लखनऊ) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी रोहित हा पूर्वी पिंपरी-चिंचवड शहरात शिक्षण घेण्यास असल्याने तो खंडणी मागितलेल्या महिलेला ओळखत होता. तो त्यांच्याच वसाहतीत राहायला असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.तसेच दोन्ही आरोपीनि अधिकची माहिती मिळवण्यासाठी फेसबुकचा वापर केला.आरोपीने अगोदर पुण्याच्या लोहगाव विमानतळावर महिलेला पैसे घेऊन बोलावले.मात्र पोलिसांना जागा योग्य न वाटल्याने त्यांना वाकड परिसरात बोलवण्यास महिलेला सांगितले.त्याप्रमाणे वाकड पोलिसांनी कंबर कसत तब्बल ६ अधिकारी आणि ४० कर्मचारी सापळा रचून होते यात काही पोलीस कर्मचारी डॉक्टर, फळविक्रेता,भाजी विक्रेता यांच्या वेशात उभे होते.त्याप्रमाणे सापळा रचला आणि अनोळखी दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनीच खंडणीसाठी आल्याने सांगितले. अधिक तपास वाकड पोलीस करत आहेत.

Review