प्रवरा सांस्कृतिक महोत्सवामुळे विद्यार्थ्यांना टी.वी. सिरयल आणि चित्रपटात संधी मिळेल – डॉ. सुजय विखे पाटील

कोल्हार (सह्याद्री बुलेटिन ) साईप्रसाद कुंभकर्ण - गणेशोत्सवानिमित्त आयोजित एक गाव एक गणपती प्रवरा सांस्कृतिक व क्रीडा महोत्सवाने जिल्ह्यातच नव्हे तर राज्यासमोर सांस्कृतिक क्षेत्रात नवा आदर्श घालून दिला आहे. महाराष्ट्र राज्य विधानसभेचे विरोधी पक्ष नेते ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या बहुरंगी महोत्सवामुळे एकाच वेळी राहाता, शिर्डी, गणेश परिसर, कोल्हार, सात्रळ, लोणी येथील सर्वसामान्य, गोरगरीब आणि जातिभेदाच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांना आपापल्या कलांचे प्रदर्शन करण्याची संधी या व्यासपीठामुळे मिळाली आहे. यामध्ये प्रवरा परिसरातील सहा हजार विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक व सात
हजार विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्धामध्ये सहभाग नोंदविला आहे. ही आनंदाची बाब आहे. महोत्सवात घेण्यात आलेल्या स्पर्धामधून निवडक विद्यार्थ्यांना मराठी मालिका आणि चित्रपटातून काम करण्याची संधी देण्यास मी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय आणि जनसेवा फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हार भगवतीपूर येथील श्री भगवतीदेविच्या प्रांगणात आयोजित ;एक गाव एक गणपती ;प्रवरा सांस्कृतिक व क्रीडा महोत्सवातील कोल्हार केंद्र अंतर्गत भव्य लकी ड्रॉ. ची सोडत डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. विजेत्यामध्ये अनुक्रमे पहिले बक्षीस फ्रीज-सौरभ बर्डे, एल.ई.डी. टी.व्ही.-सत्यम काळे, कुलर-आरबाज पिंजारी, मोबाईल –ऐश्वर्या शेलार, सायकल-ज्ञानदेव शेळके, पैठणी साडी- सोमनाथ काळे, वाटर फिल्टर-स्वप्नील शिंदे, इलेक्ट्रिक शेगडी-रियाज शेख, डिनर शेट –संतोष माली, मिक्सर-गणेश केदारी, जेवणाचा डबा-विठ्ठल राजभोज यांना वितरीत करण्यात आली. डॉ.विखे पुढे म्हणाले यावर्षी पंचक्रोशीतील प्रेक्षकांच्या सहकार्याने ;प्रवरा सांस्कृतिक व क्रीडा महोत्सव’ यशस्वीपणे पार पडला. पुढच्या वर्षी याहीपेक्षा चांगले कार्यक्रम आणि बक्षिसे देणार असल्याचे ही डॉ. विखे यांनी सांगितले. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य विधानसभेचे विरोधी पक्ष नेते ना. राधाकृष्ण विखे पाटील हे विद्यार्थ्यांच्या कला गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांचे कौतूक करून प्रेमाची थाप देण्यासाठी उपस्थित होते. प्रास्ताविक कोल्हार भगवतीपुर केंद्र
समन्वयक प्राचार्य डॉ. संपतराव वाळुंज यांनी केले. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी कारखान्याचे चेअरमन डॉ.भास्करराव खर्डे, कोल्हार भगवतीपूर चे सरपंच रावसाहेब खर्डे, उपसरपंच ज्ञानेश्वर खर्डे, माजी सरपंच सुनील शिंदे, माजी उपसरपंच स्वप्नील निबे, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब दळे, प्रशांत खर्डे, जिल्हा परिषद सदस्य दिनेश बर्डे, धनंजय लोखंडे, कल्याण खर्डे, भीमराज खर्डे, गोरक्ष खर्डे, पोपट नेहे, भागवत शेळके, संतोष लोखंडे, भगवती देवालय ट्रस्ट चे माजी सेक्रेटरी हरिकीसन खर्डे, अमोल थेटे प्राचार्य गोरक्षनाथ खर्डे, भानुदास खर्डे, रामभाऊ चव्हाण, बापूसाहेब चिंधे, शिरसाठ, निर्मळ, डॉ. प्रवीण तुपे, अर्चना विखे, डॉ. सोपान डाळिंबे, अनिल आहेर, डॉ. गणेश देशमुख, डॉ. राजेंद्र वडमारे, डॉ. प्रकाश पुलाटे, विनोद कडू, परमेश्वर विखे, विविध शाळा व महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागप्रमुख यांच्यासह परीक्षक म्हणून परीक्षक म्हणून प्रा. शशिकांत शिंदे. प्रा. आर चितळकर, डॉ. भाऊसाहेब नवले, डॉ. नवनाथ शिंदे यांनी काम पाहिले. सर्व ग्रामस्थ, पंचक्रोशीतील महिला, विद्यार्थी, उत्साही तरुण, ज्येष्ठ नागरिक, शिक्षक, शिक्षेकतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Review