मनपा शास्तीकरात मिळणार 90 टक्के सवलत

पिंपरी ( सह्याद्री बुलेटिन ) - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील नागरिकांना थबाकीवर आकारल्या जाणा-या दंडात्मक मनपा शास्तीत 90 टक्के सवलत देण्यात येणार आहे. प्रशासनाच्या प्रस्तावानुसार स्थायी समितीने मंगळवारी (दि.25) तसा निर्णय घेतला आहे. मंजुरी दिली. 
ममता गायकवाड स्थायी समिती बैठकीच्या अध्यक्षस्थानी होत्या. महापालिका करसंकलन विभागाकडून मिळकत कराची आकारणी केली जाते. मात्र, ज्या मिळकतधारकांकडून मिळकत कर वेळेत भरला जात नाही. त्यांच्याकडे थकीत रक्कम अघिक असल्याने त्यावर प्रति महिना 2 टक्के दंड म्हणून मनपा शास्ती आकारली जाते. शास्तीकराच्या थकबाकीची रक्कम मोठी असून वर्षानुवर्षे नागरिकांकडून ती भरली जात नाही. त्यामुळे त्यात सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला. 
या उद्देशाने महापालिका प्रशासनाने मांडलेल्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली. ऑक्टोबर महिन्यात 1 ते 15 ऑक्टोबर या दरम्यान थकबाकी भरल्या शास्तीत 90 टक्के, तर दुस-या पंधरवड्यात 16 ते 31 ऑक्टोबर या कालावधीत 75 टक्के सवलत देण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली.

Review