राफेल करारावरुन पवारांनी उचलली मोदींची तळी,

राफेल करारावरुन राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी लोकांना नरेंद्र मोदींच्या उद्देशावर शंका नसल्याचं म्हटलं आहे. लोकांना मोदींच्या उद्देशावर शंका नाही. सुरुवातील निर्मला सीतारमन माहिती देत होत्या. आता अरुण जेटलींनी त्यांची जागा घेतली आहे. करारातील महत्त्वाची माहिती जाहीर करण्यात आली नाही असं दिसत आहे. ज्याप्रकारे माहिती सादर करण्यात आली त्यावरुन शंका उपस्थित झाल्या आहेत’.राफेलच्या किंमती जाहीर करण्यास धोका नाही, बोफोर्सवेळी भाजपानेही हीच मागणी केली होती: शरद पवार यावेळी शरद पवारांनी विरोधकांची करारातील तांत्रिक माहिती आणि तपशील जाहीर करण्याची मागणी चुकीची असल्याचं सांगितलं. मात्र विमानाची किंमत जाहीर करण्यात काही धोका नसल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच या मुद्द्यावर संयुक्त संसदीय समिती गठीत करण्याच्या मागणीला पाठिंबा दर्शवला. राफेलच्या किंमती जाहीर करण्यास कोणताच धोका नसल्याचे शरद पवारांनी म्हटले आहे. बोफोर्स तोफांवेळी काँग्रेसवर आरोप झाल्यानंतर भाजपाने हीच मागणी केली होती. सुषमा स्वराज यांनी कोणत्याही परिस्थितीत बोफोर्स संबंधीची माहिती जाहीर झालीच पाहिजे, अशी भूमिका घेतली होती, अशी माहिती पवार यांनी दिली.

Review